देवरिया (उत्तरप्रदेश) येथे दारू तस्‍करांकडून हवालदाराची वाहनाखाली चिरडून हत्‍या !

महानंद यादव असे या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्‍यांना गंभीर स्‍थितीत गोरखपूरमधील रुग्‍णालयात भरती केले; मात्र  तेथे त्‍यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.

(म्‍हणे) ‘सनातन धर्म नष्‍ट केला, तर अस्‍पृश्‍यता आपोआप नष्‍ट होईल !

जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्‍यासाठीच सनातन धर्म नष्‍ट केला पाहिजे. जर सनातन नष्‍ट झाले, तर अस्‍पृश्‍यताही नष्‍ट होईल, असे पुन्‍हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्‍याचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी यांनी केले. ते राज्‍यपाल आर्.एन्. रवि यांच्‍या विधानावर प्रत्‍युत्तर देतांना बोलत होते.

डोबिमळा (जिल्‍हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन !

आंबेगाव तालुक्‍यातील डोबिमळा येथे ‘हलाल जिहाद’ (इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) याविषयी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते.

(म्‍हणे) ‘कॅनडाच्‍या दाव्‍यात तथ्‍य !’

पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र सचिव सयरुस काझी यांनी भारत आणि कॅनडा यांच्‍यातील वादावरून विधान केले आहे. ते म्‍हणाले, ‘‘कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी केलेल्‍या दाव्‍यात निश्‍चित काही तरी तथ्‍य आहे.’’ या वेळी त्‍यांनी ‘भारताचे कुलभूषण जाधव पाकिस्‍तानला अस्‍थिर करण्‍याच्‍या कामामध्‍ये होते’ असा आरोपही केला.

हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या सूत्राविषयी भारताशी चर्चा ! – ऑस्‍ट्रेलिया

कॅनडातील हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणाची अजूनही चौकशी चालू आहे; परंतु त्‍यासंबंधीचे अहवाल चिंताजनक आहेत. आम्‍ही आमच्‍या भागीदारांसह या समस्‍येचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. याखेरीज आम्‍ही या सूत्रावर भारताशीही बोललो आहोत, अशी प्रतिक्रिया ऑस्‍ट्रेलियाचे परराष्‍ट्रमंत्री पेनी वांग यांनी व्‍यक्‍त केली आहे.

राज्‍यातील ३६ पैकी १३ जिल्‍ह्यांमध्‍ये दुष्‍काळसदृश परिस्‍थिती !

राज्‍यातील ३६ पैकी १३ जिल्‍ह्यांमध्‍ये दुष्‍काळसदृश परिस्‍थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्‍ह्यांमध्‍ये १ जून ते १८ सप्‍टेंबर या कालावधीमध्‍ये पडणार्‍या सरासरी पावसात २० टक्‍क्‍यांहून अधिक न्‍यूनता दिसून आली.

नागपूर येथे २ किलो सोने आणणार्‍या दोघांना अटक !

विमानतळावर १९ सप्‍टेंबरच्‍या पहाटे ३.१५ वाजता कतार येथून आलेल्‍या २ तरुणांना सीमाशुल्‍क विभागाने २ किलोंहून अधिक सोन्‍यासह पकडले. त्‍याची किंमत १ कोटी रुपये आहे.

 पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान !

‘गानवर्धन संस्‍था पुणे’ आणि ‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’ यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात आला.

(म्‍हणे) ‘कॅनडातील हिंदूंनी त्‍वरित देश सोडून निघून जावे !’

बंदी घालण्‍यात आलेली खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्‍या हिंदूंना त्‍वरित कॅनडा सोडून जाण्‍याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे.

पुण्‍यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर ३५ सहस्र महिलांनी केले अथर्वशीर्षाचे पठण ! Ganeshotsav

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर २० सप्‍टेंबर या दिवशी ३५ सहस्र महिलांनी श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण केले. प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते.