पुण्‍यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर ३५ सहस्र महिलांनी केले अथर्वशीर्षाचे पठण ! Ganeshotsav

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरासमोर २० सप्‍टेंबर या दिवशी ३५ सहस्र महिलांनी श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण केले. प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. सध्‍या संस्‍थानामध्‍ये गणेशोत्‍सव चालू आहे, त्‍याचाच एक भाग म्‍हणून ‘मंदिर ट्रस्‍ट’च्‍या वतीने अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्‍सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्‍सव मंडप आणि परिसर महिलांच्‍या शिस्‍तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्‍यानंतर ॐकार जप आणि मुख्‍य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्‍यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. (Ganeshotsav, Ganapati)