डोबिमळा (जिल्‍हा पुणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन !

‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट 

पुणे – आंबेगाव तालुक्‍यातील डोबिमळा येथे ‘हलाल जिहाद’ (इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) याविषयी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने व्‍याख्‍यान आयोजित करण्‍यात आले होते. समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक श्री. सुनील घनवट अन् पुणे जिल्‍हा समिती समन्‍वयक श्री. पराग गोखले यांनी उपस्‍थितांना हलाल जिहाद, तसेच लव्‍ह जिहाद यांची भीषणता विशद केली. याचा गावातील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी जिज्ञासूंनी हलाल प्रमाणित उत्‍पादने न वापरणे आणि याविषयी समाजामध्‍ये जागृती करण्‍याचा निश्‍चय केला. त्‍याचसमवेत समितीकडे प्रत्‍येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्‍याची मागणीही केली.