लोणावळा (पुणे) येथे हवाई दल तळ परिसरात ‘ड्रोन’द्वारे चित्रीकरण करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

लोणावळ्‍यातील ‘लायन्‍स पॉईंट’ परिसरात हवाई दलाचे तळ, नौदलाची ‘आय.एन्.एस्. शिवाजी संस्‍था’, तसेच महत्त्वाच्‍या सैन्‍य संस्‍था आहेत. त्‍यामुळे या परिसरात ‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे चित्रीकरण करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

आज विदर्भवाद्यांकडून ‘नागपूर करारा’ची होळी !

विदर्भ राज्‍य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवू औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्‍वतंत्र विदर्भ मिळवण्‍यासाठी ‘करू किंवा मरू किंवा कारागृहात सडू’, अशी घोषणा केली आहे.

नाशिक येथे घरात झालेल्‍या भीषण स्‍फोटात ३ जण घायाळ 

नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका घरात डिओड्रंटमुळे (दुर्गंधीनाशकामुळे) भीषण स्‍फोट झाल्‍याचे म्‍हटले जात आहे. यात घरातील ३ जण गंभीर घायाळ झाले असून घर आणि वाहने यांच्‍या काचाही फुटल्‍या. या प्रकरणी अन्‍वेषण चालू असून घायाळांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

 भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे.पी. नड्डा आरती करत असतांनाच पुण्‍यातील मंदिराच्‍या कळसाला फटाक्‍यांमुळे लागली आग !

भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौर्‍यावर असतांना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्‍यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्‍पाची आरती करण्‍यासाठी २६ सप्‍टेंबर या दिवशी जे.पी. नड्डा आले होते; मात्र त्‍याच वेळी गणेश मंडळाने साकारलेल्‍या महाकाल मंदिराच्‍या देखाव्‍याला आग लागली.

ʻविचारस्‍वातंत्र्यʼ म्हणजे काय नाही, हे लक्षात घ्या !

‘विचारस्‍वातंत्र्य म्‍हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्‍या विरुद्ध बोलायचे स्‍वातंत्र्य नाही’, हेही स्‍वातंत्र्यापासून गेली ७६ वर्षे भारतावर राज्‍य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्‍या लक्षात आले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकीत महिलांना ३३ टक्‍के आरक्षण द्या ! – लोकराज्‍य जनता पक्ष

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महिलांना ३३ टक्‍के आरक्षणाचे धोरण लागू करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांना ‘लोकराज्‍य जनता पक्षा’च्‍या वतीने देण्‍यात आले.

नालासोपारा येथे धर्मांधाकडून १ लाख ८० सहस्र रुपयांची ब्राऊन शुगर हस्‍तगत !

अमली पदार्थांच्‍या विक्रीतून समाजाला व्‍यसनाधीन करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

१ ऑक्‍टोबर या दिवशी राज्‍यात राबवणार ‘स्‍वच्‍छतेसाठी एक तारीख-एक घंटा’ उपक्रम ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

१ ऑक्‍टोबर या दिवशी  प्रत्‍येकाने स्‍वत:चा १ घंटा स्‍वच्‍छतेसाठी द्यावा. राज्‍यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्‍यमंत्री सक्षम शहर स्‍पर्धा’ आणि ‘मुख्‍यमंत्री सक्षम वॉर्ड स्‍पर्धा’ राबवण्‍यात येणार आहे. लोकसहभागातून अभियान यशस्‍वी करावे, असे आवाहन या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्‍याकडून सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !

‘आरक्षण घेतल्‍याविना शांत बसणार नाही. गिरीश महाजन यांनी आम्‍हाला ‘सरसकट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतो’, असे सांगितले आहे.