कायदाबाह्य विवाहातून जन्मलेली मुलेही पालकांच्या संपत्तीचे वारसदार असणार !

कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

हरेगाव प्रकरणाचा संबंध जोडून भिल्ल समाजाच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित !

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे शहरप्रमुख विजय पवार यांनी हरेगाव प्रकरणातील आरोपी म्हणून आदिवासी समाजाच्या युवकाला मारहाण केली. हरेगाव प्रकरणाशी काही संबंध नसतांना आदिवासी व्यक्तीची अपकीर्ती करून तिला मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘देहलीत निर्माण केलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहे !’ – उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् बनले सिंगापूरचे ९ वे राष्ट्राध्यक्ष !

सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी … Read more

‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना विरोध करणार्‍या हिंदूंना ‘मैत्रीला किंवा प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा उपदेश करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ?

प्रतापगड (राजस्थान) येथे पतीनेच गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून गावकर्‍यांसमोर १ किलोमीटर पळायला लावले !

मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्‍या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या युवतीची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी

तालुक्यातील कलमठ गावातील १७ वर्षीय धर्मांध युवतीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानविषयीची आणि हिंदूंच्या एका देवतेविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केली होती.

खडपाबांध, फोंडा येथे मूर्तीशाळा आणि शेतकरी बाजार यांचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते उद्घाटन

‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे.