हरेगाव प्रकरणाचा संबंध जोडून भिल्ल समाजाच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित !

प्रतीकात्मक छायाचित्र

श्रीरामपूर – भारतीय रिपब्लिकन पक्षाचे शहरप्रमुख विजय पवार यांनी हरेगाव प्रकरणातील आरोपी म्हणून आदिवासी समाजाच्या युवकाला मारहाण केली. हरेगाव प्रकरणाशी काही संबंध नसतांना आदिवासी व्यक्तीची अपकीर्ती करून तिला मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी पवार यांच्यावर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पवार यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे लक्षात घेऊन श्रीरामपूर येथून त्यांना कायमस्वरूपी तडीपार करून त्यांची दहशत मोडून काढावी, यासाठी एकलव्य संघटना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस यांना भेटणार आहेत.