‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रज्ञान’ रोव्हरने गेल्या १० दिवसांत चंद्रावर १०० मीटर अंतरापर्यंत मार्गक्रमण केल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे. सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

त्यानंतर या भागात सूर्यास्त होऊन अंधार आणि प्रचंड थंडी पडेल. येथील तापमान उणे २०३ डिग्रीसेल्सिय इतक्या नीचांकी जाईल. त्यामुळे या काळात ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ निष्क्रीय होतील; कारण ते सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर कार्यरत आहेत.