काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

२ जण करत होते सरकारी नोकरी !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. आदिल फारुख फरीदी, इश्तियाक अहमद,  इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक, एजाज, जमील आणि इश्तियाक अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण राज्यातच सामान्य नागरिक म्हणू रहात होते. यांतील २ जणांना सरकारी नोकरीही मिळाली होती. एक शिक्षण विभागात, तर दुसरा न्यायालयात काम करत होता. या सर्व आतंकवाद्यांवर अपहरण, हत्या, काश्मिरी हिंदु आणि सुरक्षदले यांच्यावर आक्रमण करण्यासाठी लोकांना चिथावणे आदी आरोप आहेत. त्यांनी त्यांच्या कारवाया मशिदींचे साहाय्य घेऊन केल्या होत्या.

(काश्मीरमध्ये मशिदींचा उपयोग कशासाठी केला जात होता ?, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा मुसलमान राजकीय पक्ष, नेता तोंड उघडणार नाही ! – संपादक)

पोलिसांना संशय आहे की, अशाच प्रकारे अन्य पसार आतंकवादीही जम्मू-काश्मीरमध्येेच रहात असतील.

७३४ आतंकवादी अद्यापही पसार !

जम्मू-काश्मीरमध्ये अन्वेषण यंत्रणांची २ पथके सध्या पसार असणार्‍या आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. पसार आतंकवाद्यांची संख्या ७३४ इतकी आहे. यांत काश्मीरमधील ४१७, तर जम्मूमधील ३१७ जणांचा समावेश आहे. यांतील ३६९ जणांची ओळख पटवण्यात आली आहे, तर ८० जणांचा मृत्यू झाला आहे. ४५ जण पाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत. १२७ जणांची माहिती अद्याप मिळालेली नाही.

संपादकीय भूमिका

  • पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !
  • ३० वर्षे पसार असणार्‍या आतंकवाद्यांना पकडू न शकणार्‍या पोलिसांची कार्यक्षमता स्पष्ट होते ! अशांना घरी बसवणेच योग्य !