(म्हणे) ‘देहलीत निर्माण केलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहे !’ – उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे  चूकच आहे

नवी देहली – देहलीत ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी होणार्‍या जी-२० परिषदेच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण करण्यात आलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहेत, असा खुलासा उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी केला.
जी-२० परिषदेच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून धौला कुआं भागातील हनुमान चौक येथे रस्त्याच्या कडेला १२ कारंजी निर्माण करण्यात आली आहेत.

भाजपच्या नेत्या चारू प्रज्ञा यांनी ट्वीट करून आम आदमी पक्षाच्या सरकारने धौला कुआं येथे शिवलिंगाच्या आकाराची कारंजी लावल्याचा आरोप प्रथम केला होता. त्यास आम आदमी पक्षाने भाजपनेच ही कारंजी लावल्याचा प्रत्यारोप केला.

संपादकीय भूमिका

अशी कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !