कर्नाटकातील शेतकर्‍यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाबाहेर म्हादईवरील प्रकल्पावरून निदर्शने !

‘‘म्हादईवर उभारण्यात येणार्‍या कळसा-भंडुरा प्रकल्पांवरून भाजप राजकारण करत नाही. भाजप सरकार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सिद्धतेत आहे. कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने लवकरात लवकर प्रकल्पाला संमती देऊन ती केंद्राला पाठवली पाहिजे.’’ – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप !

‘आजोबा, पणजोबा यांनी गुन्हा केला, तर नातवंडे, पतवंडे यांना शिक्षा करत नाहीत; मात्र काही ब्राह्मणद्वेष्टे काही पिढ्यांपूर्वी काही ब्राह्मणांनी केलेल्या कथित अपराधांची शिक्षा सर्वच ब्राह्मणांना करत आहेत. हे पाप होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवान परशुराम हेच गोव्‍याचे निर्माते, तर छत्रपती शिवाजी महाराज आराध्‍यदैवत ! – सत्‍यविजय नाईक, दक्षिण गोवा समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘शांत गोव्‍याला संवेदनशील प्रदेश बनवण्‍याचे षड्‍यंत्र ?’

मराठवाड्यात पावसाअभावी ३५ लाख हेक्‍टरवरील खरीपाची पिके धोक्‍यात !

अत्‍यल्‍प पावसामुळे मराठवाड्यातील खरीपाची उत्‍पादन क्षमता सरासरी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्‍याचा अंदाज आहे. पुढील ८ दिवसांत मुसळधार पाऊस न झाल्‍यास ३५ लाख हेक्‍टरवरील संपूर्ण खरीप पिके धोक्‍यात येण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

चेन्‍नई येथे ‘वेदिक सायन्‍स रिसर्च फाऊंडेशन’च्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘अखंड भारत निर्मिती’चा ठराव

‘वेदिक सायन्‍स रिसर्च फाऊंडेशन’च्‍या वतीने प्रतिवर्षी देशाच्‍या फाळणीच्‍या दिनाच्‍या, म्‍हणजेच १४ ऑगस्‍ट या दिवशी ‘अखंड भारत निर्मिती’चा ठराव करण्‍याविषयीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम चेन्‍नईच्‍या टी. नगरमधील गुरुबालाजी कल्‍याण मंडपामध्‍ये आयोजित करण्‍यात आला.

भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या विनायक चतुर्थीच्‍या नियोजन बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘भारत हिंदु मुन्‍नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्‍या  वतीने उमा सूरज सभागृह, चेन्‍नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्‍यात आले होते.

गेवराई शहरामध्‍ये चालू असलेले अनधिकृत पशूवधगृह बंद करा ! – सकल हिंदु समाज

गेवराई शहरातील निकम गल्ली घाटे फॅब्रिकेशनच्‍या मागील गोडाऊनमध्‍ये मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह तात्‍काळ बंद करण्‍यात यावे, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नगर परिषदेकडे देण्‍यात आले.

अल्‍पसंख्‍यांक मंत्रालय बंद करा !

हिंदूबहुल देशात अल्‍पसंख्‍यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्‍याची वेळ आता आली आहे !

पंडित विष्‍णू दिगंबर पलूस्‍कर यांचे संगीताच्‍या प्रसाराचे कार्य अद्वितीय ! – राजेश नार्वेकर, आयुक्‍त

पंडित विष्‍णू दिगंबर पलूस्‍कर यांचे भारतीय शास्‍त्रीय संगीताच्‍या प्रचार-प्रसाराचे कार्य अद्वितीय असल्‍याचे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी वाशी येथे केले.

‘ब्‍लू बटन जेलीफिश’, ‘स्‍टिंग रे’ यांच्‍या दंश टाळण्‍यासाठी मुंबई किनारपट्टीवर जाण्‍यास नागरिकांना बंदी !

ऑगस्‍ट ते ऑक्‍टोबर या कालावधीमध्‍ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्‍लू बटन जेलीफिश’, ‘स्‍टिंग रे’ या प्रजातीचा वावर अधिक आढळून येतो. त्‍यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्‍याचे आवाहन केले आहे.