नवी मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) – पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर यांचे भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अद्वितीय असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी वाशी येथे केले. ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबईच्या वतीने भारतीय कलेचे क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी, गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलूस्करजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पलुस्करजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. २१ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता वाशीतील गांधर्व निकेतन येथे तबला वादन, बासरी वादन, नगमा, गायन, सारंगी आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.