‘ब्‍लू बटन जेलीफिश’, ‘स्‍टिंग रे’ यांच्‍या दंश टाळण्‍यासाठी मुंबई किनारपट्टीवर जाण्‍यास नागरिकांना बंदी !

मुंबई – ऑगस्‍ट ते ऑक्‍टोबर या कालावधीमध्‍ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्‍लू बटन जेलीफिश’, ‘स्‍टिंग रे’ या प्रजातीचा वावर अधिक आढळून येतो. त्‍यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्‍याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी मत्‍स्‍य व्‍यवसाय विभागाच्‍या अधिकार्‍यांनी जुहू चौपाटी येथे भेट दिली होती. नागरिकांना ‘जेलीफिश’ने दंश केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक उपाययोजना करण्‍याची विनंती मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाने मुंबई महानगरपालिकेला केली आहे. या कालावधीत नागरिकांना समुद्रात जाण्‍यापासून मज्‍जाव करण्‍यात आला आहे.

‘स्‍टिंग रे’चा दंश झाल्‍यास नागरिकांना दंशाच्‍या जागी आग किंवा चटका लागल्‍यासारखे वाटते. जेलीफिशचा संसर्ग झाल्‍यास त्‍यांच्‍या दंशामुळे पुष्‍कळ खाज सुटते.