चेन्नई – ‘भारत हिंदु मुन्नानी’ (भारत हिंदु आघाडी) च्या वतीने उमा सूरज सभागृह, चेन्नई येथे विनायक चतुर्थीविषयी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी सहभाग घेतला. या बैठकीमध्ये भारत हिंदु मुन्नानीचे १५० जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी श्री गणेशतत्त्व आणि त्याच्याशी संबंधित विविध कृतींचा भावार्थ स्पष्ट केला, तसेच त्यांनी कुलदेवता अन् दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले.
भारत हिंदु मुन्नानीचे संस्थापक श्री. प्रभुजी यांनी हिंदु धर्मासाठी निःस्वार्थ भावाने कार्य करण्याचे महत्त्व विशद केले. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या धर्मशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.