राष्‍ट्र सुयोग्‍य स्‍थितीत रहाण्‍यासाठीही उपवास आवश्‍यक ! – पू. भिडेगुरुजी

१५ ऑगस्‍टला संपूर्ण देशात-गावात भगवे झेंडे घेऊन हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होण्‍यासाठी ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढली पाहिजे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

तुम्‍हाला न्‍यायव्‍यवस्‍था म्‍हणजे गंमत वाटते का ?

वारंवार नोटीस बजावूनही राणा दांपत्‍य सुनावणीसाठी अनुपस्‍थित रहात असल्‍याने न्‍यायालयाने १० ऑगस्‍ट या दिवशी तीव्र शब्‍दांत अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे

तलाठ्याची नेमणूक न झाल्‍यास तहसील कार्यालयास टाळे ठोकू ! – किरण लाड, अध्‍यक्ष, क्रांती दूध संघ

१५ दिवसांमध्‍ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची कुंडल गावासाठी नेमणूक व्‍हावी, तसेच सध्‍याच्‍या महिला तलाठी यांचे स्‍थानांतर करावे. असे न झाल्‍यास तहसील कार्यालयास टाळे ठोकू, अशी चेतावणी क्रांती दूध संघाचे अध्‍यक्ष किरण लाड यांनी दिली.

नवाब मलिक यांना २ मासांसाठी जामीन !

वैद्यकीय कारणामुळे नवाब मलिकांना जामीन देण्‍यात आल्‍यामुळे ‘ईडी’कडूनही विरोध करण्‍यात आलेला नाही. नवाब मलिक यांना मूत्रपिंडाचा आजार आहे.

६० एकर शासकीय भूमीवर ६ दशके शेती करणार्‍यांना दंड !

चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या ब्रह्मपुरी तालुक्‍यातील मौजा अकापूर उपाख्‍य रुपाला येथे ६० एकर शासकीय भूमीवर सहा दशके शेती करून त्‍यावर पीककर्जाचाही लाभ घेणार्‍यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने विस्‍तृत अहवाल आणि प्रस्‍ताव राज्‍यशासनाच्‍या वतीने सादर केला आहे; मात्र तसे असूनही आजपर्यंत मराठी भाषेची उपेक्षा होत आहे

कात्रज (पुणे) येथील अनधिकृत ‘बीफ’ची दुकाने बंद करावीत !

अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्‍वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्‍या वरदहस्‍तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्‍काळ कारवाई करावी !

परिपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि बाल्यावस्थेतील विज्ञान !

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषि-मुनींनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतात कुणी काही पालट करू शकत नाही; कारण त्यांनी चिरंतन सत्य सांगितले आहे. त्यामुळे त्यात ‘संशोधन’ असे काही नसते. याउलट बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या विज्ञानात ‘संशोधन’ सतत करावे लागते; कारण त्यांचे सिद्धांत काही काही वर्षांनी पालटत असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या  कर्तृत्‍वाचा सन्‍मान ! – उदयनराजे भोसले

सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्‍यात आले आहे.  ऐतिहासिक सातारा नगरीत वैद्यकीय महाविद्यालयासारख्‍या मोठ्या महत्त्वाच्‍या वास्‍तूस समर्पक नाव दिले गेले आहे.

अधिक मासातील अध्‍यात्‍म चिंतन धन्‍यतेची अनुभूती देते ! – वेदांत चुडामणी अशोकशास्‍त्री कुलकर्णी

आपल्‍या दैनंदिन व्‍यापातून स्‍वतःसाठी वेळ काढून लोकोत्तरपुरुष भगवान श्रीकृष्‍ण आणि पुरुषोत्तम भगवान प्रभु श्रीराम यांचे नामस्‍मरण केल्‍यास धन्‍यतेची अनुभूती मिळवता येते, असे प्रतिपादन आळंदी येथील न्‍याय-वेदांत चुडामणी श्री. अशोकशास्‍त्री कुलकर्णीगुरुजी यांनी केले.