बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा हवा !

‘मुंबई -मडगाव’ या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, देहली यांच्याकडे केली आहे.

दगडूशेठ बाप्पाचे दर्शन ते मेट्रोचे लोकार्पण, असा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा !

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान महिलांनी कावड यात्रेचा मार्ग रोखल्याने पोलिसांकडून कावड यात्रेकरूंवरच लाठीमार !

लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर, तर २ अधिकारी निलंबित !

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत सलग ८ व्या दिवशीही गदारोळ !

सातत्याने संसदेत गदारोळ केला जात असल्याने कामकाज होत नसेल आणि गदारोळ करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसेल, तर संसद चालू ठेवायची का ?, याचाच आता विचार करण्याची वेळ आली आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणार्‍या चौघा मुसलमान मुलांना अटक !

लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष कसा निर्माण होतो ?, याची चौकशी पोलीस करतील का ?

… तर कुराणाचा अवमान करणार्‍यांना मुसलमानांनी शिक्षा करावी ! – लेबनॉनमधील आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला

स्विडन आणि डेन्मार्क येथे कुराण जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अनेक इस्लामी देशांना निषेध केला आहे.

कुराण जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी डेन्मार्क उपाययोजना काढणार ! – डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री

युरोपीय देश डेन्मार्कचे परराष्ट्रमंत्री लार्स लोके रासमुसेन यांनी म्हटले आहे की, डेन्मार्कमधील विदेशी दूतावासांसमोर कुराणाचा अवमान होऊ नये, यासाठी कायद्यामध्ये पालट करण्यासाठी सरकारचा अभ्यास चालू आहे.

कोलकाता येथे दारू विकत घेतांना ५ रुपये अल्प दिल्यामुळे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेले बंगाल राज्य !

पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडे सापडली संवेदनशील स्थळांची छायाचित्रे !

राजस्थानमधील जयपूर शहरात बाँबस्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत असलेल्या ‘अल् सुफा’ या आतंकवादी टोळीशी संबंधित दोघा आतंकवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी कुलाब्यातील ‘छाबड हाऊस’ची पहाणी केल्याची माहिती समोर आली आहे.