बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान महिलांनी कावड यात्रेचा मार्ग रोखल्याने पोलिसांकडून कावड यात्रेकरूंवरच लाठीमार !

लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांचे स्थानांतर, तर २ अधिकारी निलंबित !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील जोगी नवादा येथे कावड यात्रा ज्या मार्गावरून निघणार होती, तेथे मुसलमान महिलांनी धरणे आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न करूनही त्या हटण्यास सिद्ध नव्हत्या. शेवटी येथून जाणार्‍या कावड यात्रेकरूंना पोलिसांनी लाठीमार करून पांगवल्यावर या महिलांनी धरणे मागे घेतले आणि त्या निघून गेल्या. सरकारने या लाठीमाराच्या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांचे स्थानांतर केले, तर पोलीस ठाण्याचा प्रमुख अभिषेक सिंह आणि पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार यांना निलंबित केले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात येथील गुंसाई गौटिया भागात कावड यात्रेवर मुसलमानांनी दगडफेक केली होती. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. आता ३१ जुलैला कावड यात्रेकरू मंदिरात अभिषेक करण्यासाठी जात असतांना मुसलमान महिलांनी या मार्गावर धरणे आंदोलन चालू केले होते. कावड यात्रेकरू याच मार्गाने जाण्याचे सांगत असल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी कावड यात्रेकरूंवर लाठीमार केला.

संपादकीय भूमिका

  • अशा अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबल्यास इतर पोलिसांचे हिंदूंवर अत्याचार करण्याचे धाडस होणार नाही !
  • पोलिसांची ही कृती म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार आहे ! हिंदूंवर असा अन्याय करायला बरेली पोलीस भारताचे आहेत कि पाकिस्तानचे ?