पुणे – लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट या दिवशी पुण्यात येणार आहेत. या पुणे दौर्यात त्यांची विविध कार्येही नियोजित करण्यात आली आहेत. यामध्ये पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तर १२ वाजून ४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचाही या नियोजनात समावेश आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.
प्रधानमंत्री मोदी मंगलवार को पुणे का दौरा करेंगे. इस दौरान वह विभिन्न विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास करेंगे. इस समारोह में शरद पवार भी शामिल होंगे-#PMModi #Maharashtra #Pune #SharadPawarhttps://t.co/vHirZTe5CO
— ABP News (@ABPNews) July 31, 2023
पंतप्रधान या पुरस्काराचे ४१ वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिग्गजांमध्ये डॉ. शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन्.आर्. नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन् या मान्यवरांचा समावेश आहे.