कोलकाता येथे दारू विकत घेतांना ५ रुपये अल्प दिल्यामुळे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !

कोलकाता (बंगाल) – येथील गरियाहाट रस्त्यावर असलेल्या दारूच्या दुकानात ५ रुपये अल्प दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली. यात या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ समोर आले आहे. त्याआधारे पोलिसांनी दारूच्या दुकानाचा मालक आणि त्याच्याकडे काम करणारे तीन कर्मचारी यांना अटक केली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांनी दारूच्या दुकानाची तोडफोड केली.

१. सुशांत मंडल असे मृताचे नाव असून तो दुकानातील कर्मचार्‍याशी वाद घालतांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

२. या प्रकरणी रवींद्र सरोवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दुकानाचा मालक देबोज्योती साहा याच्यासह अमित कार, प्रभात दत्ता आणि प्रसेनजीत वैद्य या तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेले बंगाल राज्य !