लेबनॉनमधील आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याची चिथावणी !
नवी देहली – कुराणाचा अवमान करण्याची अनुमती देणार्यांच्या विरोधात इस्लामी देश कारवाई करत नसतील, तर आता मुसलमानांनी अवमान करणार्यांवर आक्रमण करून त्यांना शिक्षा केली पाहिजे, अशी चिथावणी लेबनॉन येथील आतंकवादी संघटना ‘हिजबुल्ला’चा प्रमुख हसन नसरल्लाह याने दिली आहे. स्विडन आणि डेन्मार्क येथे कुराण जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा अनेक इस्लामी देशांना निषेध केला आहे.
जिस देश में कुरान जलाए जाएँगे, उन पर हमला कर मुस्लिम खुद दें सजा: मुहर्रम के मातम पर हिजबुल्ला सरगना नसरल्लाह का आतंकी पैगाम#QuranBurning #Muharramhttps://t.co/HH2h66XyMp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 30, 2023
दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात हसन नसरल्लाह म्हणाला की, स्विडन आणि डेन्मार्क यांनी लक्षात घेतले पाहिजे की, आमचा देश कुराणाचा अवमान सहन करणार नाही. कुराणाच्या अवमानाविषयी आम्ही ‘इस्लामिक सहयोग संघटने’च्या (ओआयसीच्या) धोरणाची वाट पहात आहोत. जर या संघटनेकडून धोरण घोषित झाले नाही, तर हे संघटन आमच्या धर्माचे रक्षण करण्यास योग्य नाही, असे आम्ही समजू. इस्लामी देश आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री यांनी स्विडन आणि डेन्मार्क येथे इस्लामवर सातत्याने होणार्या आक्रमणांविषयी पावले उचलली पाहिजेत. तसेच या देशांना स्पष्ट संदेश दिला पाहिजे की, जर इस्लामवर आणखी आक्रमणे झाली, तर त्याचे उत्तर आर्थिक बहिष्कार घालून दिले जाईल. जर इस्लामी देश असे करणार नसतील, तर जगातील वीर युवा मुसलमानांनी इस्लामचा अवमान करणार्यांना शिक्षा करण्यासाठी सिद्ध रहावे.