आक्रमणाच्या प्रतिकारार्थ हिंदूंना सज्ज रहाण्याचा सल्ला देणारा द्रष्टा नेता स्वातंत्र्यवीर सावरकर !
दुसर्या महायुद्धात सिंगापूर हरल्यावर जपानी नभोवाणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर १० मार्च १९४२ रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगूनही जपानच्या हाती पडली.