आपला देश हा शांतता प्रिय आहे. सर्वांच्या सुखासाठी जगण्याचे संस्कार करणारी आपली संस्कृती आहे. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, या सिद्धांताच्या पायावर उभारलेल्या समाज जीवनाचे प्रतिनिधीत्व करणारा आपला देश आहे. आपल्या देशाची ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि धार्मिक परंपरा अत्यंत श्रेष्ठ आहे. जगाने ही गोष्ट जरी अमान्य केली, तरी सत्य पालटणार नाही. काळाच्या ओघात जगातील सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत. हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक परकीय आक्रमकांनी केला; पण एकाही दानवी वृत्तीच्या नराधमाला हे अघोर कृत्य करण्यात यश आलेले नाही. हे कुणालाही नाकारता येणार नाही.
आजही आपला देश, धर्म, आपली संस्कृती यांच्याशी वैरभाव मनात जतन करणारे नराधम या भूतलावर उजळमाथ्याने वावरत आहेत. असे नराधम आपल्या देशातही आहेत, ही सर्वांत दुर्दैवाची गोष्ट आहे.
१. ‘ख्रिस्ती राष्ट्र’ बनवण्यासाठी ख्रिस्त्यांकडून धर्मांतर आणि विकासकार्यात अडथळा
ख्रिस्ती धर्मातील काही लोकांना हिंदुस्थानचे ‘ख्रिस्ती राष्ट्रा’त रूपांतर घडवून आणावयाचे आहे. केरळमधील विझिंजम बंदराच्या विकासकार्यात अडथळा निर्माण केला जात आहे. तेथील स्थानिक लोकांना हाताशी धरून केलेल्या आंदोलनात व्हॅटिकनचे पिवळे ध्वज फडकावण्यात आले होते. विविध प्रकारची प्रलोभने दाखवून ख्रिस्ती धर्माची दीक्षा देऊन त्यांचे धर्मांतर आजही घडवले जात आहे.
२. मुसलमानांच्या कुकृत्यांना पाठबळ देत काँग्रेसने केलेले राष्ट्रदोही कृत्य
मुसलमान समाज तर या देशाच्या मुळावरच उठला आहे कि काय ? असे वाटते. लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, हलाल जिहाद अशा अनेक प्रकारच्या जिहादच्या मार्गावरून चाललेली मुसलमानांची वाटचाल म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वावर आणि स्वातंत्र्यावर केलेले आक्रमणच आहे. त्यांना राष्ट्रघातक कृत्य करण्यासाठी पाठबळ मिळावे; म्हणून काँग्रेसने वक्फ बोर्ड कायदा जन्माला घातला आणि त्याला अधिकाधिक बलवान बनवले. सत्तेचा उपभोग घेतांना काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने अशा प्रकारच्या स्वकृत्यानेच स्वतःला राष्ट्रद्रोही ठरवले आहे.
३. देशभक्त मास्टर तारा सिंह यांनी स्वतंत्र पंजाबची मागणी केल्याचा दावा खोटा !
त्याचप्रमाणे खलिस्तानवादाचा पुरस्कार करणार्यांनी एक कपोलकल्पित कहाणी रचून देशभक्त असलेल्या मास्टर तारा सिंह यांना अवमानित केले आहे. हिंदुस्थानच्या विभाजनाला ज्यांनी जोरदार विरोध केला, त्या मास्टर तारा सिंह यांनी स्वतंत्र पंजाबची मागणी केल्याचा दावा खलिस्तानवाद्यांकडून केला जात आहे. हीच लज्जास्पद गोष्ट आहे. मास्टर तारा सिंह हे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे संस्थापक ! देशाच्या विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा मांडला गेला, त्या वेळी काँग्रेसने विभाजनाच्या बाजूने कौल दिला. काँग्रेसची ही भूमिका देशभक्त असलेल्या मास्टर तारा सिंह यांना आवडली नाही. पंजाबमधील ज्या भागात मुसलमानांची संख्या अधिक होती, तो भाग पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला. पंजाबमध्ये ज्या भागात शिखांची संख्या अधिक होती, तोही भाग पाकिस्तानात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता. देशाची भाषावार आणि प्रांतवार रचना करण्यात येत होती. त्याला अनुसरून पंजाबची मागणी केली जात होती. ‘पंजाबची ही मागणी म्हणजे तो हिंदुस्थानपासून फुटून निघावा अशी आहे’, असा अर्थ लावला गेला.
३ अ. मास्टर तारा सिंह यांनी बॅरिस्टर जीना आणि इंग्रज यांनी दिलेला ‘स्वतंत्र शीख’ राज्याचा प्रस्ताव फेटाळून लावणे : त्यानुसार बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी मास्टर तारा सिंह यांना वर्ष १९४४ मध्ये भेटण्यासाठी बोलावले. पाकिस्तानात स्वतंत्र शीख राज्य निर्माण करण्याचा सल्ला जिनांनी तारा सिंह यांना दिला. तो त्यांनी तात्काळ फेटाळून लावला. वर्ष १९४५ मध्ये इंग्रजांनी शिमल्याला एका संमेलनाचे आयोजन केले होते. त्या वेळी भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी भारतात स्वायत्त सरकार स्थापन करण्याच्या योजनेला सहमती दर्शवली होती. त्यासाठी देशातल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ते भेटले. देशातील राजकीय तणाव नष्ट करण्यासाठी त्यांनी शिखांचे प्रतिनिधीत्व करणार्या मास्टर तारा सिंह यांना भेटीसाठी बोलावले होते.
३ आ. मास्टर तारा सिंह यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला दर्शवलेला विरोध : १६ ऑगस्ट १९४६ या दिवशी महंमद अली जिना यांनी ‘डायरेक्ट एक्शन डे’ (हिंदूंच्या विरोधातील थेट कृतीचा दिवस) घोषित केला. लाहोरमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. त्या वेळी मास्टर तारा सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने पंजाबच्या विभाजनाची मागणी केली. तोपर्यंत मुसलमानांकडून रावळपिंडीत हिंदु आणि शीख यांची अमानुष कत्तल करण्यात आली होती. या कत्तलीत मास्टर तारा सिंह यांच्या कुटुंबातील ५९ सदस्यांना मारण्यात आले होते.
मास्टर तारा सिंह यांच्या कार्याकडे पाठ फिरवून त्यांनी स्वतंत्र पंजाबची मागणी केल्याची खोटी कहाणी आज रचली जात आहे.
मास्टर तारा सिंह आणि त्यांचे सहकारी ज्ञानी कर्तार सिंह यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला जोरदार विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या मृतदेहावर ‘पाकिस्तानची निर्मिती होऊ शकते’, असे उद्गार काढले होते. मास्टर तारा सिंह म्हणाले होते, ‘‘शीख हा एक धर्म आहे, तरीसुद्धा स्वतंत्र पंजाब राज्याची मागणी करणे अयोग्य आहे. त्यामुळे अशी मागणी धुडकावून दिली गेली पाहिजे.’’ भाषावार प्रांतरचनेला अनुसरून स्वतंत्र पंजाबच्या केलेल्या मागणीचा संबंध पंजाबच्या स्वायतत्तेशी जोडणे, ही परिकल्पना आहे.
३. फुटीरतावाद्यांनी मास्टर तारा सिंह यांच्या नावे खलिस्तानच्या मागणीची आवई उठवणे
आज खलिस्तानची मागणी करणारे फुटीरतावादी मास्टर तारा सिंह यांना अपकीर्त करत आहेत. हे फुटीरतावादी कोणत्याही प्रकारे शीख समाजाचे नेतृत्व करत नाहीत. मास्टर तारा सिंह यांनी खलिस्तानची मागणी केल्याची आवई फुटीरतावाद्यांनी उठवली आहे. हेच मास्टर तारा सिंह वर्ष १९६४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विश्व हिंदु परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याचा विसर फुटीरतावाद्यांना पडला असला, तरी आपल्याला त्याचा विसर पडता कामा नये.
४. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केलेली देशाची अपकीर्ती ही स्वतःची बुद्धी विटाळल्याचे लक्षण
आपला कुटील हेतू साध्य करून घेण्यासाठी हे देशाचे शत्रू गतकाळातील देशभक्तांना अपकीर्त करून स्वतःची राष्ट्रघातकी भूमिका शुद्ध आणि सात्त्विक आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच लांच्छनास्पद गोष्ट आहे.
काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी तर विदेशाच्या भूमीवर हिंदुस्थानची अपकीर्ती करून स्वतःची वाणी आणि बुद्धी विटाळली असल्याचे सिद्ध केले. फुटीरतावादी वृत्ती बाळगून देशभक्तांनाच अपकीर्त करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांना या देशाचे निष्ठावान नागरिक म्हणण्यासाठी बुद्धी वाचा आणि लेखणी यांना अनुमती देत नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२९.३.२०२३)