निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७६
‘केस गळणे, भूक न लागणे, थकवा येणे, अंगात वेदना होणे, झोप नीट न लागणे, वारंवार आजारी पडणे, लहानसहान गोष्टींचे वाईट वाटून घेणे ही लक्षणे ‘ड’ जीवनसत्त्व न्यून झाल्यानेही निर्माण होऊ शकतात. शरिराच्या त्वचेचा सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क आल्यावर ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण होते. आजकाल बर्याच जणांचे उन्हात जाणे होत नसल्याने अनेकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची न्यूनता दिसून येते. पुरेशा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी प्रत्येकानेच सकाळी किंवा सायंकाळी साधारण २० मिनिटे अंगावर कोवळे ऊन घ्यायला हवे. शरिराचा शक्य तेवढा भाग उघडा ठेवून सूर्यकिरण थेट त्वचेवर पडू द्यावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२३)
आतापर्यंतचे सर्व लेख वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकवर किंवा ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन करा ! |