सनातन संस्था घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ साधनासत्संगात सहभागी होणार्‍या रत्नागिरी येथील सौ. अस्मिता अभिजित सरदेसाई यांना नामजपामुळे आलेली अनुभूती !

सौ. अस्मिता सरदेसाई

१. नामजप करत पोळ्या केल्यावर पोळी भाजतांना त्यावर ‘ॐ’ उमटलेला दिसणे

‘८.२.२०२३ या दिवशी आमच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त २५ माणसे जेवायला येणार होती. भाजी, कोशिंबीर आणि भात करून झाल्यावर मी पोळ्या करायला घेतल्या. मला ६० पोळ्या करायच्या होत्या; म्हणून मी पोळ्या करतांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करत पोळ्या करायचे ठरवले. मी देवाला नमस्कार करून नामजप करत अनुमाने ४० पोळ्या केल्या. पोळ्या करतांना माझा नामजप सतत चालू होता. चाळीसावी पोळी भाजत असतांना मला पोळीवर ‘ॐ’ उमटलेला दिसला. ते पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. कदाचित् ‘मी नामजप करत पोळ्या करत असल्याचा तो परिणाम असावा’, असे मला वाटले.

२. नामजपामुळे चांगली अनुभूती आल्यामुळे ‘सदैव देवाची सेवा आणि नामजप करायचा’, असे ठरवणे

‘माझ्याकडे जेवायला येणार्‍या अतिथींना सात्त्विक अन्न मिळावे’, यासाठी मी नामजप करत पोळ्या केल्यावर मला चांगली अनुभूती आली. मी अनेक वर्षे पोळ्या करत आहे; पण आज नामजप करत पोळ्या केल्यामुळे मला ही अनुभूती आली. यापुढेही मी देवाची सदैव सेवा करीन आणि सतत नामजप करीन.’

– सौ. अस्मिता अभिजित सरदेसाई, रत्नागिरी. (८.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक