‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे केवळ एका स्थूल देहापुरते मर्यादित नसून ते प्रत्येक देवतेमध्ये तत्त्वरूपाने विराजमान आहेत’, याची साधकाला आलेली प्रचीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. राहुल कुलकर्णी

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात ‘त्यांच्या डोळ्यांतून प्रेम बाहेर पडत आहे’, असे जाणवणे आणि ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटणे

‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी ‘त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे’, असे मला वाटले. तेव्हा त्यांनी माझ्या आई-वडिलांची विचारपूस केली आणि आमचे इतर बोलणे झाले. मी केवळ त्यांच्या डोळ्यांकडेच पहात होतो. त्यांच्या डोळ्यांतून एक प्रकारचे प्रेम बाहेर पडत होते. मला त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटत होते.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक देवतेच्या माध्यमातून प्रेम करत आहेत’, असे जाणवणे

त्यानंतर रात्री मी गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना मला गणपतीऐवजी तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे डोळेच दिसत होते, तसेच ‘गणपतीमधून त्यांचे प्रेम माझ्याकडे येत आहे’, याची मला जाणीव झाली. अशीच जाणीव मला मारुतीच्या मूर्तीच्या संदर्भातही झाली. त्या वेळी मला जाणवले, ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक देवतेच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करत आहेत.’ त्यांचे प्रेम मला त्यांच्या डोळ्यांतून जाणवले. हे प्रेम प्रत्येक देवतेकडून मला मिळत असते.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वेगवेगळ्या देवतांच्या माध्यमातून दर्शन देत आहेत आणि ते साधना करण्यासाठी शक्ती देत आहेत’, असे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टर केवळ एका स्थूल देहापुरते मर्यादित नसून ते प्रत्येक देवतेमध्ये विराजमान आहेत आणि त्या देवतेच्या माध्यमातूनच ते आम्हा साधकांवर प्रेम करत आहेत. ते मला वेगवेगळ्या देवतांच्या माध्यमांतून दर्शन देत आहेत आणि साधनेचे प्रयत्न करण्यासाठी शक्ती देत आहेत. ‘परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये सर्व देवतांचे तत्त्व आहे’, असे नसून परात्पर गुरु डॉक्टरच सर्व देवतांमध्ये तत्त्वरूपाने आहेत’, अशी अनुभूती त्यांनी मला दिली. त्यांनी मला सर्व देवतांमधील प्रेम अनुभवायला दिल्याबद्दल आणि माझ्यामध्येही देवतांविषयी प्रेम अन् जवळीक निर्माण केल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक