अमरावती, १५ एप्रिल (वार्ता.) – येथील अमरावती-मोर्शी मार्गाने जात असलेल्या चारचाकी वाहनातून ५२ गोवंशियांना नेण्यात येत आहे, हे शिरखेड पोलिसांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून तपासणी केली. वाहनाच्या आतमध्ये गोवंशियांना कोंबून बाहेरील बाजूने शीतयंत्रे (कूलर) ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गोवंशियांचा जीव वाचला.
अमरावती येथे गोवंशियांच्या संदर्भात गोरक्षकांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना !
येथून अशी अनेक वाहने गोवंशियांना घेऊन जात असल्याचे गोरक्षकांना प्रतिदिन लक्षात येते. त्याविषयी ते पोलिसांना माहितीही देतात. काही प्रकरणांत अमरावती येथील गोरक्षकांवर आक्रमणेही झाली होती. गोतस्करीसाठी विनाक्रमांकाच्या प्रवासी वाहनांचाही वापर होत आहे. पथकर नाक्यावरील बॅरिकेट्स तोडून ही वाहने जलद निघून जातात. याविषयी उपाययोजना काढण्यासाठी अमरावती येथील गोरक्षकांनी प्रशासनाला निवेदने दिलेली आहेत.
संपादकीय भूमिकाकेवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे ! |