अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची हत्या

  • पत्रकाराच्या रूपात आलेल्या तिघांनी गोळ्या झाडून केले ठार !

  • हत्येनंतर आक्रमणकर्त्यांनी पत्करली शरणागती !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा गुंड भाऊ अश्रफ अहमद यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दोघांना येथील कॉल्विन रुग्णालयात आणण्यात आले होते. तेव्हा अतिक आणि अश्रफ पत्रकारांशी बोलत होते.

त्याच वेळी पत्रकाराच्या रूपात तेथे आलेल्या ३ जणांनी पाठीमागून येऊन या दोघांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. गोळीबारानंतर या तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यावर त्यांना अटक करण्यात आली.