छेडानगर उड्डाणपूल
ठाणे – मुंबई ते ठाणे प्रवासात आता सिग्नलचा अडथळा नसेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा, तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
Chheda Nagar Flyover part B (Mankhurd end of the Mankhurd to Thane Side flyover) is open for traffic in #Mumbai on Thursday. pic.twitter.com/NNQoD73yYC
— TOI Mumbai (@TOIMumbai) April 13, 2023
मानखुर्दवरून ठाणे दिशेकडील १.२३ कि.मी. लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्दवरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नलमुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवी मुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील.