बनावट औषधे बनवणार्‍या १८ फार्मा आस्थापनांचे परवाने रहित !

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची कारवाई !

१८ फार्मा आस्थापनांचे परवाने रहित (प्रतिकात्मक छायायाचित्र )

मुंबई – ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआयने) बनावट औषधे बनवणार्‍या १८ फार्मा आस्थापनांचे परवाने रहित केले आहेत. २० राज्यांतील ७६ आस्थापनांच्या तपासणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्यप्रदेशातील २३ आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्या येतात. त्या पार्श्‍वभूमीवर या धाडी टाकण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !