हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल !
‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
इतिहासात महिलांना दुय्यम स्थान होते, असा खोटा प्रचार सध्या केला जातो; मात्र ते चुकीचे आहे. भारताला अनेक पराक्रमी आणि कर्तृत्ववान महिलांचा इतिहास लाभला आहे; परंतु दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास सांगितला जात नाही.
विधीमंडळात झालेल्या निर्णयानुसार एस्.टी.च्या प्रवासात महिलांसाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयावर १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून कार्यवाही करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
घोषित केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल.
या निर्णयामुळे अनुमाने १ लाख मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे. सवलतीची वसुली पूर्वलक्षी प्रभावाने होणार असल्याने त्याचा ९९ सहस्र मिळकतधारकांना फटका बसला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडे ‘आरे’ दूध संघाकडील कर्मचारी वर्ग वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !
जिल्हा परिषदेच्या मैदानावर १४ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात चोरांनी ५ लाख ९१ सहस्र ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.