अनिक्षा जयसिंघानी यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी !

अमृता फडणवीस यांना धमकावल्याचे प्रकरण

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षा जयसिंघानी यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. हा संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

अमृता फडणवीस यांची अनिक्षाशी पहिली भेट वर्ष २०२१ मध्ये झाली होती. अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने अमृता यांना धमकावले आणि षड्यंत्र रचले. त्यानंतर पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवला.