सातारा येथे एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात लाखो रुपयांची चोरी !

सातारा, १८ मार्च (वार्ता.) – येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर १४ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात चोरांनी ५ लाख ९१ सहस्र ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याविषयी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद झाल्या आहेत. (अशा कार्यक्रमाला चोरी होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

१४ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. यामुळे सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधूनही भाविक सत्संगासाठी आले होते. या वेळी काही महिलांनी चोरी केली. संबंधितांनी दिलेल्या माहितीवरून ७ महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.