
रामनाथी, १८ मार्च (वार्ता.) – शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते. सनातनचे साधक अधिवक्ता योगेश जलतारे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन कार्याची माहिती दिली. संत कर्नल के.एस्. मजेथीया यांनीही जिज्ञासेने आश्रमातील कार्य जाणून घेतले.
या वेळी संत कर्नल के.एस्. मजेथिया म्हणाले, ‘‘देवाला बाहेर धुंडाळू नका. देव तुमच्या आत असतो. त्याची उपासना आपण करायची असते. साधकाच्या साधनेचा प्रवास तम, रज ते सत्त्वगुणापर्यंत होत असतो; परंतु अती सत्त्वप्रधान वृत्तीही घातक ठरते. त्यामुळे साधकाने त्रिगुणातीत होणे आवश्यक असते. ‘मी कुणीतरी आहे’, असे वाटते, तोपर्यंत तुम्हाला काही साध्य होणार नाही. ‘मी कुणीच नाही’, असे वाटल्यावर तुम्ही काहीतरी साध्य करू शकाल. परंपरा टिकवून ठेवणे सोपे नसते, ते कठीण काम तुम्ही करत आहात.’’ आश्रम परिसरातील यज्ञकुंड पहातांना ते म्हणाले, ‘‘आध्यात्मिक त्रासाला सामोरे जाण्यासाठी नामजप हाच योग्य उपाय आहे.’’ ‘म्लेंच्छांना शांतीचा पाया नाही; त्यांचा इतिहासच तलवारीने गळा कापण्याचा आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
या प्रसंगी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संत कर्नल के.एस्. मजेथिया यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ अर्पण करून सन्मान केला, तसेच त्यांना ग्रंथही भेट देण्यात आला.

आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय
१. आश्रमातील साधक ईश्वरप्राप्तीसाठी योग्य मार्गाने प्रयत्न करत आहेत. येथे सर्वजण गुरूंच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहेत.
– संत कर्नल के.एस्. मजेथिया
२. आश्रमातील सर्वजण मनमिळावू आहेत. आश्रमातील साधकांना भेटल्यावर मला पुष्कळ आनंद मिळाला. गोव्यात एवढा सुंदर सनातन आश्रम आहे, हे मला ज्ञातही नव्हते.
– सौ. किरण सिंग
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !