गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची  क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. त्यामुळे गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे सांगितले.

ते पुढे म्हणाले,

१. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांचा एक भाग म्हणून संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.
२. आपल्याला हे साध्य करण्यासाठी प्रशिक्षित मन्युष्यबळाची आवश्यकता आहे. आपली संसाधने प्रभावीपणे हाताळण्यासाठी सक्षम व्यक्ती सिद्ध करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.
३. तंत्रज्ञान आणि सेवांचा प्रभावी वापर करण्यासाठी कर्मचार्‍यांची गुणवत्ता आवश्यक आहे.
४. गोव्याला संरक्षणक्षेत्राला पुरवठा करण्याचे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे. गोव्यात आधीच वेर्णा येथे जहाजबांधणीसाठी कोकण सागरी क्लस्टर आहे, ज्यामुळे ३ सहस्र रोजगार निर्माण होतील.
५. गोव्याची हवा, पाणी आणि रस्ते यांविषयीची संपर्कयंत्रणा भारताच्या संरक्षण उद्योगाला धोरणात्मकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते.