महापुरुषांचा अवमान करणार्‍याच्या विरोधात तक्रार देणार्‍या स्वानंद पाटील यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) कडकडीत बंद !

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) – शिरोळ येथील निहाल शफिक शेख या धर्मांध तरुणाने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवून तो सामाजिक माध्यमांवर पाठवला होता. निहालवर शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी स्वानंद पाटील याने तक्रार दिली असून त्याने तक्रार दिल्यावर १७ मार्चला रात्री अज्ञात तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक आक्रमण केले. तरी आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी १८ मार्चला शिरोळ शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.