इयत्ता दहावी आणि बारावी यांच्या परीक्षांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी यांच्या परीक्षेच्या कालावधीत झालेल्या अपप्रकारांविरोधात आतापर्यंत १० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांत सर्वाधिक ३ गुन्हे अमरावती विभागात, प्रत्येकी २ गुन्हे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, तर १ गुन्हा मुंबई विभागीय कार्यालयांतर्गत नोंद झाले आहेत. यावर्षी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी यांची परीक्षा अत्यंत काटेकोर पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. परीक्षेपूर्वी मुख्य सचिवांनी राज्य मंडळ आणि राज्यातील संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन ‘कॉपी’मुक्त अभियानाची प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

संपादकीय भूमिका

हे शिक्षण मंडळाला लज्जास्पद !