अमरावती येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा आविष्कार !

हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि महावीर मिशन ट्रस्ट यांच्या वतीने अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सभेला प्रारंभ !

काढलेली जलपर्णी तशीच नदीत सोडल्याने आळंदी (जिल्हा पुणे) येथील इंद्रायणी नदी जलपर्णीमय !

डुडुळगाव ते आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे; परंतु पाण्यातील जलपर्णी काढल्यानंतर ती नदीच्या काठावर न टाकता ती तशीच नदीत पुढे ढकलली जात आहे.

पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोहरादेवी, नगारा भवन येथे ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच ५० कोटी देण्याचीही घोषणा या वेळी केली.

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयी आयआयटी, पवई येथे कार्यशाळा

उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतातील अतीउष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची कार्यवाही, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना नोटिसा !

महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत.

सातारा नगरपालिकेकडून १०० हून अधिक अनधिकृत ‘फ्लेक्सबोर्ड’ शासनाधीन !

अनधिकृतपणे शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्सबोर्ड लावून स्वतःची जाहिरात करणार्‍या तथाकथित समाजसेवक आणि जाहिरातदार यांच्यावर नगरपालिकेच्या ‘अतिक्रमण हटाव विभागा’च्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

आरे परिसरात हिंदूंच्या मोर्च्यात पोलिसांचा लाठीमार

येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने राममंदिराच्या शेजारी कब्रस्तानला जागा देण्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार केला. मोठ्या संख्येने हिंदु धर्माभिमानी भगवे ध्वज आणि फलक घेऊन येथे आले होते.

खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णखाटांची संख्या दुप्पट केली !

कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हल्लीच्या काळात ‘जशी प्रजा, तसा राजा’ !

‘यथा राजा तथा प्रजा ।, म्हणजे ‘जसा राजा, तशी प्रजा’, उदा. रामराज्यात रामाप्रमाणे सर्व प्रजा सात्त्विक होती. आता ‘यथा प्रजा तथा राजा ।’, म्हणजे ‘जशी प्रजा, तसा राजा’, अशी स्थिती झाली आहे, म्हणजे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या प्रजेने निवडून दिलेले शासनकर्ते तसेच आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.