
अमरावती, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे, धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि महावीर मिशन ट्रस्ट यांच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सभेला प्रारंभ झाला.
प्रारंभी श्री. विलास सावरकर यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.
सभा पाहण्यासाठी क्लिक करा – https://www.facebook.com/jagohinduamravati/videos/494857776185813
आणि इतरांनाही पहायला द्या 🙏
वेदशास्त्रसंपन्न सर्वश्री योगेश महाराज जोशी आणि शैलेश पाठक यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी मांडला.
सूत्रसंचालन श्री. पराग बिंड आणि सौ. प्राजक्ता जामोदे यांनी केले. या वेळी ‘महावीर मिशन ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष श्री. नीलेशचंद्र जैन मुनी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर, रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहरातील धर्माभिमानी हिंदु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन