संस्कृती जिंवत ठेवण्यासाठी महिलेने बनवला १०८ कलाकारांचा ‘सप्तपदी’ समूह !  

पालटत्या काळानुसार पारंपरिक गीतांची परंपरा लोप पावत आहे. विवाह किंवा अन्य कोणत्याही शुभप्रसंगी गीत गायले जाते. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न सूरतमधील ‘सप्तपदी’ या समूहाने केला आहे. याचे नेतृत्व एक महिला करत आहे. यात १०८ कलाकारांचा समावेश आहे.

यंदा होणार्‍या चारधाम यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक भाविकांसाठी नाव नोंदणी अनिवार्य !

हिंदु धर्मात चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांच्या दर्शनासाठी हिंदू कित्येक मासांपासून वाट पहात असतात. ही सर्व तीर्थक्षेत्रे उत्तराखंड राज्यात असून यंदा राज्यशासनाने या यात्रेसाठी काही नियम बनवले आहेत.

उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप !

उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एन्.जी.आर्.आय.ने) व्यक्त केली आहे. ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरे, दुकाने, हॉटेल यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

पाकने चीनकडून घेतलेली शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे ठरत आहेत कुचकामी !

चीनचा हाच इतिहास राहिला आहे. त्यामुळे पाकला देण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये तरी काय वेगळे असणार ? पाकिस्तानकडे चीनला जाब विचारण्याचे तरी धाडस आहे का ?

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !

धरणे बांधणे यांसारखे केवळ वरवरचे उपाय करणारे शासनकर्ते नकोत !

‘नुसती धरणे बांधून दुष्काळाला तोंड देता येईल का ? धरणे बांधली; पण पाऊसच आला नाही, तर धरणांचा काय उपयोग ? ‘अमुक इतके दुष्काळामुळे मेले’, अशा बातम्या छापत रहाणार का ? असे होऊ नये म्हणून जनतेला साधनेची गोडी लावावी. जनतेने साधना केल्यामुळे अवर्षण किंवा पूर कधीच येणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्म-ज्ञान यांचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास साहाय्य होईल ! – पद्मश्री डॉ. हिमतसिंह बावस्कर

आरोग्य विषयक संपन्नता ही बाजारात कुठेही विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

सोलापूर महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती करण्यात येणार !

वास्तविक महापालिकेतील एकूण १ सहस्र १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ३४० अत्यावश्यक पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ट अभियंता, उद्यान कर्मचारी, अग्नीशमनदल यांसह अत्यावश्यक पदांचा समावेश रहाणार आहे.

‘पेड न्यूज’प्रकरणी भाजपच्या अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस !

अश्विनी जगताप यांच्याविषयीची एक बातमी ‘न्यूज पोर्टल’ आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हे एकूणच लिखाण ‘पेड न्यूज’सारखे असल्याचे एम्.सी.एम्.सी. समितीच्या निदर्शनास आले होते.