सोलापूर महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती करण्यात येणार !

महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली माहिती

सोलापूर – राज्यशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नोकर भरतीसाठी ३५ टक्के आस्थापन व्ययाची अट शिथिल केली आहे. यामुळे महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी ३४० अत्यावश्यक पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाची मान्यता मिळाली आहे.

वास्तविक महापालिकेतील एकूण १ सहस्र १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ३४० अत्यावश्यक पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ट अभियंता, उद्यान कर्मचारी, अग्नीशमनदल यांसह अत्यावश्यक पदांचा समावेश रहाणार आहे. नियमानुसार ‘टी.सी.एस्.’ या आस्थापनाशी भरती प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात करारनामा या सप्ताहात करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.