बांगलादेशी हिंदु क्रिकेटपटू रॉनी तालुकदार यांना महाशिवरात्रीची पोस्ट काढण्यास भाग पाडले !

बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार करणे चालूच !

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस वीरगतीला प्राप्त, १ घायाळ !

संवेदनशील असणार्‍या नक्षलवादग्रस्त भागांत कर्तव्य बजावत असतांनाही पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदूक न बाळगणे हे अत्यंत गंभीर आहे !

पाकिस्तानने केवळ गरीब लोकांनाच अनुदान द्यावे !

कर्जाच्या रूपात मिळालेला हा निधीही पाकिस्तान भारतविरोधी कारवायांत व्यय (खर्च) करील, यात शंका नाही ! तसे न करण्याची अटही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला घालायला हवी !

पाकमध्ये तालिबानी आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक

पाकच्या खैबर पख्तुख्वा प्रांतातील तोरखम येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही आतंकवादी संघटना आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. टीटीपीने गेल्या मासाभरात पोलिसांवर ३ मोठी आक्रमणे केली.

१० वर्षे जुने आधारकार्ड अद्ययावत करण्याचे ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे आवाहन !

‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ म्हणजेच ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ या संस्थेकडे सर्व नागरिकांच्या आधारकार्डची माहिती संकलित करण्याचे दायित्व आहे.

चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला प्रारंभ

चारधाम यात्रेच्या ऑनलाइन आरक्षणाला २० फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला आहे. २५ एप्रिलला केदारनाथ धामची, तर २७ एप्रिलला बद्रीनाथ धामची कवाडे (मुख्य द्वार) उघडणार आहेत.

असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील घरावर अज्ञातांकडून दगडफेक

यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !

बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता.

तालिबानी कायद्यांनी विधवा महिलांना ढकलले दारिद्र्याच्या खोल दरीत !

एरव्ही महिला अधिकाराच्या नावाखाली हिंदु परंपरांच्या विरोधात टाहो फोडणारे कथित महिला अधिकारवाले हे तालिबानी जाचाच्या विरोधात कधीच ‘ब्र’ही काढत नाहीत ! यातून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो !