बांगलादेशी हिंदु क्रिकेटपटू रॉनी तालुकदार यांना महाशिवरात्रीची पोस्ट काढण्यास भाग पाडले !

बांगलादेशात कट्टरतावादी धर्मांधांकडून हिंदूंवर अत्याचार करणे चालूच !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील रॉनी तालुकदार नावाचा एक हिंदु क्रिकेटपटू मुसलमानांच्या गुंडगिरीचा बळी ठरला आहे. तालुकदार यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी एक फेसबूक पोस्ट केल्यावरून बांगलादेशातील कट्टरतावादी मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यानंतर त्यांना पोस्ट हटवण्यास भाग पाडले. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना त्यांचा धर्म मुक्तपणे पाळता येत नाही, अशी माहिती ‘व्हॉईस फॉर बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • इस्लामी बांगलादेशातील एका हिंदु क्रिकेटपटूची दुर्दशा या घटनेतून लक्षात येते ! एखाद्या राष्ट्रात बहुसंख्यांक जनता ही कोणत्या धर्माची आहे, त्यावरून अल्पसंख्यांकांची स्थिती कशी असेल, हे लक्षात येते, हे जाणा !
  • भारतीय क्रिकेट संघात सध्या ४ मुसलमान खेळाडू आहेत. त्यांचा असा छळ केला जातो का ?