बेंगळुरूसहित जगातील अनेक शाळांमध्ये ‘चॅटजीपीटी’वर बंदी !

बेंगळुरू (कर्नाटक) – शहरातील आर्.व्ही. विश्‍वविद्यालयाने कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (आर्टीफिशल इंटेलिजन्टद्वारे) चालवण्यात येणारी संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘चॅटजीपीटी’वर बंदी घातली आहे, तर शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. जगातील अनेक शहरांतील शाळांमध्ये यापूर्वीच चॅटजीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे. यात न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, सिएटल पब्लिक स्कूल, फ्रान्समधील ‘सायन्स पो’ विश्‍वविद्यालयानेही यावर बंदी घातली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, चॅटजीपीटीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

बेंगळुरूच्या महाविद्यालयांतून १ जानेवारीला आदेश देण्यात आला की, कोणताही विद्यार्थी अंतिम परीक्षेसाठी चॅटजीपीटी आणि यांसारख्या कोणत्याही कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेणार नाही.

चॅटजीपीटी काय आहे?

चॅटजीपीटी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) आहे. पूर्ण नाव ‘चॅट जेनरेटिव्ह प्रीटेन्ड ट्रान्सफॉर्मर’, असे आहे. या संगणकीय प्रणालीला प्रश्‍न विचारल्यावर ती उत्तरे देते.