आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देऊ ! – उपमुख्यमंत्री

नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकासकामांसाठी सरकारकडून पुरेसा निधी जिल्ह्यास दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. २८ जानेवारी या दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते दृकश्राव्य माध्यमांतून उपस्थित होते. वर्ष २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महानगरपालिकेने त्याचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली. कुंभमेळ्याच्या नियोजनासह अन्य सूत्रांविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळ देऊन स्वतंत्र बैठक घेणार आहेत.