|
अकोला – अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाच्या ३६ घंट्यांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्या संवादाची एक ध्वनीफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी काँग्रेस पक्ष बनावट असल्याचे म्हटले आहे. (काँग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास आणि त्याचे काम पहाता हा पक्ष बनावट आहे, असे धीरज लिंगाडे यांनी एकप्रकारे सत्यच सांगितले आहे. त्यात वावगे काहीच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला निवडणुकीत निवडून देणार्या जनतेच्या लक्षात न येणे आश्चर्यकारक ! – संपादक)
विधान परिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी या दिवशी मतदान होणार आहे. त्याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची १ ध्वनीफीत अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केली. यामध्ये शरद झांबरे यांनीच धीरज लिंगाडे यांच्याशी संपर्क साधून संवाद साधला आहे. उमेदवारी घोषित होण्याच्या आधीची ही ध्वनीफीत असल्याचे लक्षात येते.