संमेलनाच्या निधीची वाढीव २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२३

वर्धा, २९ जानेवारी (वार्ता.) – येथे होणार्‍या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सिद्धतेला आता वेग आला आहे. येथील स्वावलंबी मैदानात ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या साहित्य संमेलनासाठी महात्मा गांधी साहित्य नगरी सिद्ध झाली आहे. ठरलेला ५० लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. साहित्य संमेलनाच्या निधीची रक्कम वाढवून ती २ कोटी रुपये करण्यात आली होती. तशी घोषणाही मराठी भाषा मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती; पण अद्याप वाढीव निधी प्राप्त झालेला नाही.

संपादकीय भूमिका 

संमेलन अगदी समीप आलेले असतांना सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !