जुना पुणे नाका ते सोरेगाव रस्‍त्‍याचे काम अपूर्ण राहिल्‍याने अपघातांची संख्‍या वाढली !

जुना पुणे नाका ते सोरेगाव हा ५४ मीटरचा रस्‍ता तातडीने पूर्ण करा, अशी मागणी ‘वेकअप फाऊंडेशन’ने महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त संदीप कारंजे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली. हा रस्‍ता रखडल्‍याने शहरातील अपघातांची संख्‍या वाढली असून नागरिकांचे नाहक जीव जात आहेत, असे निवेदनात म्‍हटले आहे.

धर्मांधांच्‍या त्रासाला कंटाळून नगर येथे अल्‍पवयीन मुलीची आत्‍महत्‍या !

धर्मांध तरुणांच्‍या त्रासाला कंटाळून अल्‍पवयीन मुली आत्‍महत्‍या करत आहेत, हे संतापजनक आहे. यावरून धर्मांधांनी त्‍यांचे जीवन किती असह्य केले असेल, हे लक्षात येते.

संभाजीनगर येथे महानगरपालिकेची अनधिकृत केबलविरुद्ध धडक कारवाई !

शहरात अनधिकृत केबलचे जाळे निर्माण केले जात असतांना प्रशासकीय अधिकारी झोपलेले होते का ? खंडपिठाचा आदेश आल्‍यानंतर अनधिकृत केबल काढण्‍याची मोहीम राबवण्‍याऐवजी प्रशासन सर्वत्र लक्ष ठेवून स्‍वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते.

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष १९३७ पासूनचे कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना !

२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ

पत्नीची हत्या करून पळून जाणारा निघाला बांगलादेशी घुसखोर मुसलमान !

गेली ९ वर्षे एक घुसखोर भारतात येऊन निर्धास्त रहातो, नोकरी करतो, विवाह करतो, तरी भारतीय सुरक्षायंत्रणांना त्याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद होय ! असे लक्षावधी नासीर देशात रहात असणार, हे यातून स्पष्ट होते !

देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

दीपिका पदुकोण केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेली होती.हे कलाकार पडद्यावर देशप्रेमाची भूमिका बजावतात; मात्र त्यांची प्रत्यक्ष भूमिका देशविरोधी असते.

भारताने ऑस्ट्रेलिया सरकारकडे व्यक्त केली चिंता !

भारत सरकारने भारतातही वाढत चाललेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेच भारतियांना वाटते !

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

जगभरातील अनेक देशांकडून भारताला प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा

भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन भारताला प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तान शुभेच्छा देतांना म्हणाले, ‘‘भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी ही जगातील सर्वांत उत्पादक भागीदारीपैकी एक आहे.’’