नांदेड येथील सावरगावात पिसाळलेल्‍या कुत्र्याचा धुमाकूळ !

८ जणांचा चावा घेतला !

प्रतिकात्मक चित्र

नांदेड – जिल्‍ह्यातील मुखेड तालुक्‍यातील सावरगाव येथे पिसाळलेल्‍या मोकाट कुत्र्याने गावात धुमाकूळ घालून २३ जानेवारी या दिवशी ८ जणांचा चावा घेतला आहे. त्‍यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यात ४ जण गंभीर घायाळ झाले आहेत. रस्‍त्‍यावरील नागरिक या कुत्र्याला पाहून सैरावैरा पळत होते. पिसाळलेल्‍या कुत्र्याने दिसेल त्‍या नागरिकांच्‍या शरिराचे लचके तोडले. घायाळ नागरिक आणि मुले यांना पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलवण्‍यात आले आहे. ‘ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांना पकडण्‍यासाठी त्‍वरित उपाययोजना करून बंदोबस्‍त करावा’, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.

संपादकिय भुमिका

इतके होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?