भारताने ऑस्ट्रेलिया सरकारकडे व्यक्त केली चिंता !

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तावाद्यांकडून होत असलेल्या हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाचे प्रकरण

भारतियांची सुरक्षा करण्याची मागणी

नवी देहली – ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांत हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेल्या खलिस्तान्यांच्या आक्रमणांवरून ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने कठोर टीका करत ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांच्या वाढत्या कारवायांविषयी चिंता व्यक्त केली आहे.

भारतीय उच्चायुक्तालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही मेलबर्नमध्ये हिंदूंच्या ३ मंदिरांवरील तोडफोडीची निंदा करतो. ‘शांततापूर्ण आणि बहुधर्मी भारतियांमध्ये द्वेष आणि विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, हे स्पष्ट दिसत आहे. खलिस्तानी समर्थक ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या कारवाया वाढवत आहेत आणि त्यांना बंदी घालण्यात आलेली ‘सिख फॉर जस्टिस’ ही आतंकवादी संघटना, तसेच ऑस्ट्रेलियाच्या बाहेरून साहाय्य केले जात आहे. आम्ही आमची चिंता ऑस्ट्रेलिया सरकारला कळवली आहे. तसेच भारतियांची सुरक्षा निश्‍चित करण्याची मागणी केली आहे. तसेच तेथील भारताच्या सार्वभौमत्वाला हानी पोचवणार्‍या कारवायांना रोखण्याचे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने भारतातही वाढत चाललेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेच भारतियांना वाटते !