पत्नीची हत्या करून पळून जाणारा निघाला बांगलादेशी घुसखोर मुसलमान !

वर्ष २०१३ पासून रहात होता भारतात !

डावीकडे नासीर हुसेन

बेंगळुरू (कर्नाटक) – गरोदर पत्नीची हत्या करणारा नासीर हुसेन हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ६ मासांपूर्वीच त्याने नाझ खानम हिच्याशी विवाह केला होता. १५ जानेवारी या दिवशी त्याने २२ वर्षी नाझ हिची हत्या करून तो बांगलादेशात पळून जात असतांना कोलकाता पोलिसांनी त्याला अटक केली. तो सिलीगुडीच्या मार्गाने बांगलादेशात जाणार होता. बेंगळुरू पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी बंगाल पोलिसांना माहिती दिली होती. नासीर वर्ष २०१३-१४ या काळात भारतात घुसखोरी करून आला होता.

नाझ हिच्याशी विवाह करतांना नासीर याने तो बंगालमध्ये रहाणार असल्याचे सांगितले होते. तसेच तो अनाथ असल्याचीही बतावणी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे जप्त केली आहेत. बेंगळुरू येथे तो हार्डवेअर इंजिनीयर म्हणून काम करत होता. त्याच्याकडे याची कोणतीही पदवी नव्हती. ‘नाझ हिचे तिच्या बहिणीच्या नवर्‍याशी अनैतिक संबंध होते तिला होणारे मूलही त्याचेच आहे’, असा नासीर याला संशय होता. यातूनच त्याने नाझ हिला गर्भपात करण्यास सांगितले होते. तिने नकार दिल्यावर नासीर याने तिची हत्या केली.

संपादकीय भूमिका 

गेली ९ वर्षे एक घुसखोर भारतात येऊन निर्धास्त रहातो, नोकरी करतो, विवाह करतो, तरी भारतीय सुरक्षायंत्रणांना त्याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद होय ! असे लक्षावधी नासीर देशात रहात असणार, हे यातून स्पष्ट होते !