‘कोरोना’च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल गठीत ! – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्यशासन लक्ष ठेवून आहे. चीनसह अन्य काही देशांत या रोगाचे रुग्ण पुन्हा आढळत आहेत; म्हणून राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारसमवेत समन्वय ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे कोरोनाचे सूत्र उपस्थित केल्यानंतर त्या वेळी ते बोलत होते.